स्टेट बँकेचे किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी...वाचा सविस्तर


स्टेट बँकेचे किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याची प्रक्रिया झाली सोपी...वाचा सविस्तरनवी दिल्ली: केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभ घेणार्‍या 2.5 कोटी शेतकर्‍यांना क्रेडिट कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांना या  माध्यमातून खत, बियाणांसाठी कर्ज सहज उपलब्ध होतं. यात वेळेत कर्ज परतफेड केल्यास व्याजही कमी आकारले जाते.  याशिवाय एक लाख 60 हजार रुपयापर्यंतचे कर्ज विना तारणही मिळू शकते. आतापर्यंत 1.5 कोटी शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आलं आहे. आता भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं किसान क्रेडिट कार्डविषयी सविस्तर माहिती जाहीर केली आहे. किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया पहिल्यापेक्षा सोपी केली आहे. यासाठी लागणारं प्रक्रिया शुल्क रद्द करण्यात आलं आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडियाचे किसान क्रेडीट कार्ड

* किसान क्रेडिट कार्डच्या खात्यातील क्रेडिट रकमेवर सेव्हिंग्ज खात्याच्या दरानं व्याज दिलं जातं.

* किसान क्रेडिट कार्डधारकांना मोफत एटीएम आणि डेबिट कार्ड ( स्टेट बँक किसान कार्ड) दिले जाईल.

* वेळेत कर्ज परतफेड केल्यास  व्याजदरात 3 टक्के सूट

* 1.60 लाखांपर्यंत विनातारण कर्ज

आवश्यक कागदपत्रे : 

*विहीत नमुन्यातील अर्ज

*ओळखपत्र म्हणून मतदार कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post