साई गणेश मेडिकल & जनरल स्टोअर्स पशुवैद्यकीय सेवेत दाखल

 साई गणेश मेडिकल & जनरल स्टोअर्स पशुवैद्यकीय सेवेत दाखल कान्हूर पठार परिसरातील पशुपालक,दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांच्या पशुवैद्यकीय सेवेत दाखल साई गणेश मेडिकल & जनरल स्टोअर्स चा उद्घाटन समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी कॉम.आझाद ठूबे मा.जिल्हा परिषद सदस्य यांच्या हस्ते व ठूबे (टेकाडे) परिवार अन् नातेवाईकांच्या उपस्थितीत नारळ फोडून व फित कापून साई गणेश मेडिकलचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला असल्याची माहिती साई गणेश मेडिकलचे संचालक श्री.अमोल ठूबे यांनी दिली.

याप्रसंगी पठार भागावरील परिसरातील प्रगतशील पशुपालक, दुग्ध व्यवसायिक, दूध डेअरी चालक, पोल्ट्री व्यवसायिक, पशु वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, पशुखाद्य विक्रेते व ग्रामस्थ यांनी दिवसभरात नवीन पशु औषधलयास भेट देवून शुभेच्छा दिल्या.

कान्हूर पठार परिसरातील पशुपालक,पोल्ट्री व्यवसायिक, शेतकऱ्यांना एकाच छताखाली सर्व प्रकारच्या जनावरांची औषधे मिळणार असल्याने अनेकांनी नवीन मेडिकल सुरू केल्याबद्दल कौतुक केले. सर्वाधिक पशुधन  व पोल्ट्री व्यवसायिक,असलेल्या कान्हूर पठार परिसरातील गावांसाठी सुसज्ज अशा पशु औषधालयाची गरज होती.

सध्या दुग्ध व्यवसाय,पशुपालक, पोल्ट्री व्यवसाय, शेतकऱ्यांचा मुख्य जोडव्यवसाय समजला जातो . अनेक बेरोजगार तरुणांनी बदलत्या काळानुसार मुक्त गोठा तयार करून मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय सुरू केलाय. त्यामुळे काळाची गरज ओळखून ठूबे परिवाराने साई गणेश मेडिकल च्या माध्यमातून पशुवैद्यकीय क्षेत्रात पाऊल टाकले.हे अभिमानास्पद. गेल्या अनेक वर्षापासून स्वतः हा दुग्ध व्यवसाय केला. त्यामुळे पशुपालकांच्या अडचणी ठूबे परिवार जाणून आहे.त्याचा निश्चित फायदा पशुवैद्यकीय क्षेत्रात होणार असल्याचा प्रतिक्रिया उपस्थित मान्यवर व नातेवाइकांनी उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी दिल्या.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post