राज्यात रंगणार सहकार संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा, स्थगिती आदेश रद्द

 राज्यात रंगणार सहकार संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा, स्थगिती आदेश रद्दनगर : कोविड 19 मुळे रखडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या संस्थांच्या निवडणुका 31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्याचा 16 जानेवारी 2021 चा निर्णय अवघ्या पंधरा दिवसांत मागे घेण्यात आला असून सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या, त्या टप्प्यापासून घेण्याची कार्यवाही तात्काळ सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत राज्याचे सहकार विभागाने शासन आदेश जारी केला आहे. राज्यात विधानपरिषद तसेच ग्रामपंचायत निवडणुका कोविड काळातच सुरळीतपणे पार पडल्या. त्यामुळे सरकारने आता सहकार संस्थांच्या निवडणुकाही घेण्याचे ठरवले आहे. या निर्णयामुळे मुदत संपलेल्या सहकारी बँका,पतसंस्था, सोसायटी, सहकारी साखर कारखाने तसेच अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया आता सुरु होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post