सहा महिणे थांबला असता तर आजचा हा दिवस दिसला नसता. मुली आता पहिल्यासारख्या शोषिक राहिलेल्या नाहीत. त्यांच्या मनाविरूद्ध झालं तर त्या कुणाचंही ऐकणार नाहीत. लग्नासारख्या घटना तर त्यांच्या मनाप्रमाणे केल्या तर ठीक नाही तर अनर्थ होऊ शकतो.
प्रतिनिधी - राजेंद्र उंडे
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील अल्पवयीन मुलीचा खडांबे खुर्द येथील तरुणासोबत जबरदस्तीने विवाह लावून दिल्याचा प्रकार घडला.या प्रकरणी राहुरी पोलिसांनी नवरदेवासह पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
नवरदेव दीपक प्रकाश हरिश्चंद्रे (वय 28, रा. खडांबे खुर्द), विजय रामदास गाडे, रामदास चिमाजी गाडे, रवींद्र शंकर गाडे, सतीश भानुदास गाडे (सर्व रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) अशी आरोपींची नावे आहेत.
बेलापूर खुर्द (ता. श्रीरामपूर) येथील 17 वर्षे 6 महिने वयाच्या मुलीबरोबर दीपक हरिश्चंद्रे याचा 31 जुलै 2020 रोजी बळजबरी विवाह झाला. लग्नानंतर पीडित मुलीच्या अपहरणाचा गुन्हा राहुरी पोलिसांनी नोंदविला होता.
राहुरीचे पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके गुन्ह्याचा तपास करीत असताना 29 जानेवारी रोजी पीडित मुलगी सापडली. तिच्या जबाबावरून पोलिस उपनिरीक्षक शेळके यांनी फिर्याद दिली.
Post a Comment