आरटीओच्या मोटार वाहन निरीक्षकांचा फेब्रुवारीत तालुका दौरा

  आरटीओच्या मोटार वाहन निरीक्षकांचा फेब्रुवारीत तालुका दौरा
अहमदनगर: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अहमदनगर येथील मोटार वाहन निरीक्षकांचा फेब्रुवारी महिन्यासाठीचा तालुकावार दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यादिवशी संबंधित मोटार वाहन निरीक्षक हे त्या तालुक्याच्या ठिकाणी असणार आहेत, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिली आहे.


या वेळापत्रकानुसार दि. ९ फेब्रुवारी रोजी पाथर्डी येथे सलीम मुन्शी आणि श्री. सोनवणे हे मोटार वाहन निरीक्षक उपस्थित राहतील. दि. १० रोजी श्रीगोंदा येथे श्री. मुन्शी, श्री. सोनवणे आणि श्री. देवकर, दिनांक ११ रोजी शेवगाव येथे श्री. मुन्शी, श्री. सोनवणे आणि श्री. देवकर, दि. १८ रोजी पारनेर येथे श्री. मुन्शी, श्री. सोनवणे आणि श्री. देवकर, दिनांक २२ रोजी काष्टी येथे श्रीमती योगिता मगर, दिनांक २४ रोजी टाकळी ढोकेश्वर येथे श्रीमती योगिता मगर, दि. २५ रोजी कर्जत येथे श्री. मुन्शी, श्री. सोनवणे आणि दिनांक २६ रोजी जामखेड येथे श्री. मुन्शी, श्री. सोनवणे आणि श्री. देवकर हे उपस्थित राहतील.


याठिकाणी उपस्थित राहताना अर्जदारांनी परिपूर्ण कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. अपूर्ण कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, कॅम्पचे सर्व कामकाजाबाबत शुल्क ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाईल. दौर्‍याच्या ठिकाणी परराज्यातून आलेली वाहने (आरएमए) तसेच बसेस तपासली जाणार नाहीत. ज्या तालुक्यात कॅम्प आयोजित केला करण्यात आलेला आहे त्या तालुक्यातीलच नागरिकांचे कॅम्प मध्ये कामकाज करण्यात येईल. शिबीर कामकाज ठिकाणी तपासणी होणार्‍या सर्व नवीन वाहनांचे डिस्क्लेमर असल्या शिवाय वाहनांची तपासणी करण्यात येणार नाही. प्रत्येक तालुक्यात मासिक दौर्‍याचा नियोजित दिनांकाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल किंवा शासकीय सुटी जाहीर करण्यात आली असेल, प्रशासकीय कारणास्तव दौरा रद्द झाल्यास त्या दिवसाचे कामकाज दुसर्‍या सोईस्कर दिवशी होईल व त्याची तारीख त्यावेळी जाहीर करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.              

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post