दरोड्याच्या तयारीत असलेली सराईतांची मोठी टोळी गजाआड, एलसीबीची कामगिरी
नगर : दरोड्याचे मोठे साहित्य घेवून दरोडा टाकण्याच्या तयारीत निघालेली व चैन स्नॅचिंग करणारी मोठी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने श्रीरामपूर शहरातील भुयारी रेल्वे मार्गाजवळ सापळा रचून या टोळीला ताब्यात घेतले. रियाज शफी शेख, आजम नसीर शेख, करण अनिल अवचित्ते, दानिश अयुब पठाण, बाबर जानमहंमद शेख, बल्ली उर्फ बलीराम यादव अशी आरोपींची नावं असून सर्व आरोपी श्रीरामपुरमधीलच आहेत. त्यांच्या ताब्यातून एक स्टीलचा सुरा, लोखंडी कत्ती, स्टिलचा चाकू, लोखंडी कटावणी, मिरची पूड, चार मोबाईल, विनाक्रमांकाची मोटारसायकल, असा एकूण 1 लाख 3 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यातील चार आरोपी सराईत असून त्यांच्यावर जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सपोनि शिशिरकुमार देशमुख, सफौ नानेकर, भाउसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, मनोहर गोसावी, ज्ञानेश्वर शिंदे, विशाल दळवी, शंकर चौधरी, विजय ठोंबरे, चंद्रकांत कुसळकर आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
Post a Comment