कर्जत तालुका हादरला...प्रतिष्ठित डॉक्टराची कुटुंबियांसह आत्महत्या

 कर्जत तालुका हादरला...प्रतिष्ठित डॉक्टराची कुटुंबियांसह आत्महत्या



नगर : कर्जत तालुक्यातील राशीन येथील प्रसिध्द डॉक्टर महेंद्र थोरात (वय 46) यांनी राहत्या घरी पत्नी व दोन लहान मुलांना गळफास देत स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी पहाटे ही घटना घडली. गळफास घेतलेल्या खोलीच्या दरवाजाला त्यांनी चिठ्ठी चिटकवली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत डॉक्टरने म्हटले आहे की, माझा थोरला मुलगा कृष्णा याला कानाने ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराध्यासासारखे वाटत आहे. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित आहोत. कृष्णाचेही  कशात मन लागत नाही. हे आम्ही वडील व आई म्हणून  दुख: सहन करू शकत नाही. म्हणून मी व माझी पत्नी वर्षा आत्महत्येसारखे कृत्य करत आहोत. हे योग्य नसले तरी नाईलाजावास्तव हे कृत्य करीत आहे. यात कोणालाही जबाबदार धरू नये असा या चिठ्ठीत उल्लेख केला आहे. कैवल्य आठ वषार्चा आहे. या घटनेची माहिती कळताच हॉस्पिटल परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी या प्रकाराचा कसून तपास सुरु केला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post