लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार, एक आरोपी अटकेत

 पिंपळगाव पिसा येथील  तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार...


बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच एका आरोपीला केली तात्काळ अटकश्रीगोंदा (प्रतिनिधी प्रमोद आहेर ):  तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील १९ वर्षीय  तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून मित्राच्या मदतीने शहापूर तालुक्यातील धसई या गावाजवळ नेऊन बलात्कार केल्या प्रकरणी वैभव बाळू खामकर (रा.पिंपळगाव पिसा) व निलेश उर्फ सोनु गायकवाड (रा.निंबवी) यांच्या विरोधात पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात   अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानव्ये व बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी मुख्य आरोपी वैभव बाळू खामकर याला अटक केली असून दुसरा आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

               या बाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील एका १९ वर्षीय  तरुणीला गावातील वैभव बाळू खामकर या तरुणाने मी तुझ्याबरोबर लग्न करतो असे म्हणत दि. २५ जानेवारी रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव पिसा येथून निंबवी येथील नीलेश उर्फ सोनू गायकवाड या मित्राच्या मदतीने गाडीतुन घेवुन जात  दि. २७ जानेवारी रोजी रात्री ९ ते १० च्या वा दरम्यान शहापुर तालुक्यातील यसई गावाजवळ चारचाकी गाडीमध्ये लग्नाचे आमिष दाखवुन अत्याचार केला.  पुढील तपास उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post