हेराफेरी करुन पद मिळाल्यावर असं होतं, निलेश राणेंचा पुन्हा अजितदादांवर निशाणा

हेराफेरी करुन पद मिळाल्यावर असं होतं,  निलेश राणेंचा पुन्हा अजितदादांवर निशाणा मुंबई - भाजप नेते नेते निलेश राणे  यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. देशात मोगलाई आहे का या  सवालावरुन निलेश राणेंनी टीकास्त्र सोडलं आहे.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच अजित पवारांवर पुन्हा जोरदार टीका केली आहे. "अजित पवारांना महाराष्ट्र सरकार म्हणायचं होत चुकून देशात म्हणाले... हेराफेरी करून पद मिळाल्यावर असं होतं. परवा भाषणात कुठेतरी 'मी अनेक वेळा आमदार झालो पण जॅकेट घातलं नाही' म्हणाले, याला चिंधी विचार म्हणतात साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला" असं निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post