आ.मोनिका राजळे जिल्हा बँकेवर बिनविरोध

 


आ.मोनिका राजळे जिल्हा बँकेवर बिनविरोधनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी आ.मोनिका राजळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांनी अर्ज दाखल केलेल्या सेवा संस्था मतदारसंघातून इतर उमेदवारांनी आज अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आ.राजळे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आ.राजळे यांनी अर्ज दाखल करतानाच बिनविरोध निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला होता. सर्वाधिक ठराव आपल्या बाजूने असल्याने त्या निश्चिंत होत्या. आज इतर उमेदवारांच्या माघारीमुळे त्यांचा दावा प्रत्यक्षात उतरला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post