श्रीगोंदा तालुक्यात दोघांची रेल्वेखाली आत्महत्या

 


श्रीगोंदा तालुक्यात दोघांची रेल्वेखाली आत्महत्या


                                                                                    प्रातिनिधीक छायाचित्र

    श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील महादेववाडी शिवारात दोघांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. येळपणे येथील राजू बाबा कोळपे  व राणी राजेंद्र साबळे अशी आत्महत्या केलेल्यांची नावं असून त्यांनी मनमाड दौड रेल्वे मार्गावरील महादेववाडी शिवारात रेल्वेखाली आत्महत्या केली आहे.  सोमवारी रात्री ही घटना घडली. मयत राजू व राणी दोघे विवाहीत होते. गेल्या काही महीन्यापासून त्यांचे प्रेमसंबंध असल्याचे समजते. सोमवारी सकाळी अकरा वाजता दोघेही घरातून बाहेर पडले. याप्रकरणी घरच्यांनी बेलवंडी पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार केली. दोघांनी  आत्महत्या का केली हे पोलिस तपासात समोर येण्याची अपेक्षा आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post