महागड्या पेट्रोलला दमदार ई बाईकचा पर्याय, 50 मिनिटात फुल चार्ज

महागड्या पेट्रोलला दमदार ई बाईकचा पर्याय, 50 मिनिटात फुल चार्ज



कबिरा मोबिलिटीने दोन नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक बाईक KM3000 आणि KM4000 लाँच केल्या आहेत. ग्राहकांना जबरदस्त अनुभव प्रदान करण्याच्या उद्देशाने या दोन मेड इन इंडिया बाईक सादर करण्यात आल्या आहेत. तसेच या बाईक पर्यावरणास अनुकूल असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कबिरा मोबिलिटीने या दोन्ही बाईक्ससाठी आकर्षक किंमती ठेवल्या आहेत. KM3000, या बाईकची पीक पॉवर 6000W इतकी आहे. या बाईकची किंमत 1,26,990 रुपये (एक्स शोरुम गोवा) इतकी ठेवण्यात आली आहे, तर KM4000 या बाईकची पीक पॉवर 8000W इतकी आहे. या बाईकची किंमत 1,36,990 रुपये (एक्स शोरुम गोवा) इतकी ठेवण्यात आली आहे.या मोटारसायकल्सची डिलीव्हरी मे-2021 पासून सुरु केली जाणार आहे. कबिरा मोबिलिटी या बाईक्ससाठी 20 फेब्रुवारीपासून बुकिंग घेण्यास सुरुवात करणार आहे. सुरुवातीला दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे, हैदराबाद, बंगळुरु, चेन्नई, गोवा आणि धारवाडसारख्या शहरांमध्ये या बाईकचा सेल सुरु केला जाईल. दोन्ही बाईक्स कबिरा मोबिलिटीच्या वेबसाईटवरुन बुक करता येतील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post