पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, राज्य सरकारमधील मंत्री अडचणीत?

 पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, राज्य सरकारमधील मंत्री अडचणीत?मुंबई : पुण्यातील पुजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी भाजपानं आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री राठोडगिरी सहन करणार का? असा सवाल केला आहे. पुजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात विदर्भातल्या एका मंत्र्याचं कनेक्शन असल्याची चर्चा होत आहे. त्यालाच भातखळकरांनी उघडपणे नाव घेत राठोडगिरी असं म्हटलं आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एक ट्विट करुन मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. तो संबंधित मंत्री हा विदर्भाचा असून शिवसेनेचा असल्याचंही भातखळकर म्हणतात. 

मुळची परळीची असलेल्या पुजा चव्हाणनं गेल्या रविवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात आत्महत्या केली आहे. ही घटना महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत घडली आहे. पुजा चव्हाणनं विदर्भातल्या एका मंत्र्यासोबतच्या प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा होती. त्याची चौकशी करा म्हणून भाजपच्या पुण्यातल्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षांनी आयुक्तांना निवेदनही दिलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post