पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे मोठं वक्तव्य

 


पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे मोठं वक्तव्यमुंबई : मुळच्या परळी (बीड) येथील असलेली व पुण्यात वास्तव्यास असलेली पूजा चव्हाण या तरुणीने केलेली आत्महत्या व शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर या संदर्भात होत असलेल्या आरोपांची सखोल चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, चौकशीमध्ये सत्य काय ते समोर येईलच. मात्र, त्याच वेळी मागे झाला तसा कुणाला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असेल तर तेही योग्य नाही. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांच्या संदर्भाने मुख्यमंत्र्यांनी हे विधान केल्याचे मानले जाते.

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, या प्रकरणात एक मंत्री असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आता पोलीस काय करणार? असा सवाल केला. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी राठोड यांच्यावरील आरोपांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post