सरकारी आरोग्य यंत्रणेची अनागोंदी, पोलिओ डोस देताना बाळाच्या पोटात गेला प्लास्टिकचा तुकडा
पंढरपूर : पोलिओ लसीकरणादरम्यान पंढरपूर तालुक्यातील भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात एका बाळाच्या पोटात प्लास्टिक तुकडा उडून गेला आहे. या प्रकरणी सुपरवायझरसह दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या खुलाशानंतर त्यांच्यावर कारवाईचा निर्णय होणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. रेपाळ यांनी सांगितले. दोन दिवसापूर्वी भाळवणी येथे माधुरी बुरांडे यांच्या एक वर्षांच्या बाळाला लस देताना छोटासा प्लास्टिक टोपणाचा तुकडा थेट बाळाच्या पोटात गेला होता. यानंतर तातडीने बाळाला बालरोग तज्ज्ञाकडे नेऊन उपचार करण्यात आले होते . आता बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याचादावा डॉक्टरांनी केला असला तरी निष्काळजीपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी या बाळाच्या आईने केली आहे.
Post a Comment