करोनाचा वाढता प्रादुर्भाव...ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतला मोठा निर्णय
मुंबई : राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला काळजी घेण्याचे तसेच नियमावलींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिसाद देत पुढील काळातील सार्वजनिक कार्यक्रमांत हजेरी न लावण्याचे जाहीर केले आहे. पवारांनी आपले सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले असून याबाबत त्यांनी स्वत: व्टिटरवर माहिती दिली आहे.
Post a Comment