काळजी वाढली...राज्यात नव्या कोरोना स्ट्रेनचे रुग्ण
मुंबई : “राज्यात नव्या कोरोना स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचा हा नवा स्ट्रेन आहे. यवतमाळ आणि अमरावतीमध्ये नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं वेगळी आहेत तसंच त्याचा संसर्ग अधिक वेगाने होतो आहे”, अशी माहिती कोरोना टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी दिली आहे. अमरावतीमध्ये चार रुग्णामध्ये एक E484k म्हणून स्ट्रेन आला आहे. स्पाईक प्रोटीनचा स्ट्रेन आहे. यू.के. आणि ब्राझीलच्या स्ट्रेनशी तो मिळताजुळता आहे. या स्ट्रेनची प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते किंवा तो अधिक वेगाने पसरतो. अमरावतीमधल्या 4 रुग्णांमध्ये हा स्ट्रेन आढळून आला आहे.
Post a Comment