राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या परिवार संवाद यात्रेत दोन गटात राडा

 राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या परिवार संवाद यात्रेत धुळ्यात दोन गटात राडाधुळे-  जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे मंत्री जयंत पाटील यांच्या परिवार संवाद यात्रेत धुळ्यात दोन गटात राडा झाला. दोन गट एकमेकाला भिडल्याने मंत्री पाटील यांनाच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावत हा वाद थांबवावा लागला. यामुळे मात्र परिवार संवादामध्ये व्यत्यय आला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर दोन गटातील विसंवाद उघड झाल्याने धुळ्याच्या राष्ट्रवादीत ऑलवेल नसल्याचे स्पस्ट झाले आहे. या मेळाव्यात माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे तसेच राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा म्हाडाचे सभापती किरण शिंदे , जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील यांचे गट देखील मेळाव्याला उपस्थित असल्याने या कार्यकर्त्यांनी आपले मत मांडत असताना विधानपरिषदेवर किरण पाटील यांना संधी  देण्याची मागणी केली. तसेच एका कार्यकर्त्याने माजी आमदार अनिल गोटे यांच्या कार्यशैली संदर्भात ताशेरे ओढले. या नंतर उभ्या राहिलेल्या गोटे समर्थक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कुसुंबा गटात मदत केली नसल्याने अपेक्षित यश मिळाले नसल्याचा थेट आरोप केला. तसेच पक्ष वाढीसाठी काम करणाऱ्या अनिल गोटे यांना आमदार पदासाठी संधी देण्याची मागणी केली. यावेळी दोन्ही गटांकडून शेरेबाजी सुरू झाली. त्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये वादाला ठिणगी पडली. 

काही क्षणातच चर्चा मुद्द्यावरून गुद्द्यापर्यंत पोहोचली. यावेळी मंत्री पाटील यांनी माईकवरूनच कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. पण त्याचा उपयोग झाला नाही. काही वेळानंतर पोलिसांनी आणि माजी आमदार अनिल गोटे तसेच पाटील गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त कार्यकर्त्यांना वेगळे केले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post