नगर तालुक्यातील सरपंच, उपसरपंचांची निवड....कोण झाले गावचे नवे कारभारी..वाचा सविस्तर

 


नगर तालुक्यातील सरपंच, उपसरपंचांची निवड....कोण झाले गावचे नवे कारभारी..वाचा सविस्तरनगर :  आदर्श गाव  हिवरेबाजारच्या सरपंचपदी विमल ठाणगे तर उपसरपंचपदी पद्मश्री पोपटराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. बु-हाणनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रावसाहेब कर्डिले यांची निवड झाली आहे.  नवनागापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी डॉ. बबनराव डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली.   उपसरपंचपदी संगिता दत्तात्रय सप्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे.  भेंडा ग्रामपंचायतीत वैशाली शिंदे या सरपंच झाल्या आहेत. तर जेऊरमध्ये राजश्री मगर, वाळवणेत जयश्री पठारे, खारेकरजुनेत अंकुश शेळके, हंगा येथे बाळू दळवी यांची सरपंचपदी निवड झाली आहे. वाळवणेत पती-पत्नी सरपंच उपसरपंच झाले आहेत.

. वाळवणेत जयश्री पठारे सरपंच, सचिन पठारे उपसरपंचपदी बिनविरोध आले आहेत.  सारोळा अडवाई येथे सरपंचपदी परशुराम फड तर उपसरपंचपदी कोमल महांडुळे यांची निवड झाली आहे. रांजणगाव मशिदच्या सरपंचपदी प्रीतीताई साबळे तर उपसरपंचपदी बाबासाहेब जवक, खारे करजुनेत प्रभाकर मगर उपसरपंचपदी निवडून आले आहेत. 

आमदार निलेश लंके यांच्या हंगा ग्रामपंचायतीत बाळू दळवी सरपंचपदी तर वनिता शिंदे यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. भोयरे गांगरडा येथे मोहन पवार यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे.. उदरलमलमध्ये जोसेफ भिंगारदिवे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post