अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? हा तर सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम...

अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात?  हा तर सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम... मुंबई : “अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का?” असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नसल्यामुळे कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत, असा आरोपही देशपांडेंनी केला. “सावधान! सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी, पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. अधिवेशनात सरकारला प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत, विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकायची आहे, म्हणून कोरोनाची भीती दाखवली जात आहे” असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. “फक्त अचानक अमरावतीमध्ये आकडे कसे वाढले? अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? हा तर सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्याचं मुख्यमंत्र्यांना काही वाटत नाही का?” असंही संदीप देशपांडेंनी विचारलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post