मनसेत येण्याची राज ठाकरेंची खुली ऑफर पण 'या' अटीवर!
पुणेः ”ज्यांना कोणाला पक्षात यायचे आहे, त्यांना आताच दार उघडे असतील, निवडणुकीच्या तोंडावर नाही”, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणालेत. पुणे आणि पिंपरी महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी काल आढावा बैठक घेतली होती, त्यावेळी त्या बैठकीत त्यांनी हे स्पष्ट केलं. तसेच राज ठाकरे यांनी मनसेत इनकमिंग सुरू असल्याचं मान्य केलंय. राज ठाकरे यांनी पुण्यातील कोअर कमिटीसोबत महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.
Post a Comment