शिवसेनेत इनकमिंग, भाजपाला धक्का ! अजून एका नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
.
मुंबई : माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेते प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेहता यांनी शिवबंधन बांधलंय. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शुक्रवारी माजी आमदार आणि भाजप नेते कृष्णा हेगडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे सलग दोन दिवसांत शिवसेनेनं भाजपला दुसरा मोठा झटका दिल्याचं पाहायला मिळत आहे.
Post a Comment