मांजरसुभाच्या संरपंचपदी मंगल कदम व उपसंरपंचपदी जालिंदर कदम यांची बिनविरोध निवड

 आदर्शगाव मांजरसुभाच्या संरपंचपदी मंगल कदम व उपसंरपंचपदी जालिंदर कदम यांची बिनविरोध निवड

आदर्शगाव मांजरसुभा ग्रामस्थांना देणार डिजिटल सेवा : - जालिंदर कदमनगर :- आदर्शगाव मांजरसुभा येथे गेली १५ वर्षात ग्रामस्थांच्या सहकार्यातून विविध योजना राबून आदर्शगाव केले.

आता लवकरच मांजरसुभा ग्रामपंचायत ग्रामस्थाना देणार डिजिटल सेवा या माध्यमातून गावकऱ्यांना मोबाईलवर

ग्रामपंचायतचा कारभार पाहता येणार आहे. विविध योजनांची माहिती घरबसल्या मिळणार आहे. या माध्यमातून पारदर्शी

कारभार जनतेसमोर ठेवला जाणार आहे. जनता चांगल्या माणसाच्या पाठिमागे उभे राहते हे सिद्ध झाले आहे.

एकविचाराने काम करून विकासाचे कृती आरखडे बनवले आहे. त्याची अंमलबजावणी करायची आहे. प्रधानमंत्री कृषी

आरख्डे, पर्यटन कृषी आरखडे तयार आहेत शासनाकडे पाठपुरावा करून निधीची अंमलबजावणी केली जाईल. प्रत्येक

वार्ड सदस्यांनी आपल्या वार्डातील समस्या मासिक मिटींगमध्ये मांडाव्या व ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावे. सर्वांना

बरोबर घेऊन गावच्या विकासाला चालना देऊ असे प्रतिपादन उपसंरपंच जालिंदर कदम यांनी केले.


आदर्शगाव मांजरसुभ्याच्या संरपंचपदी मंगल कदम व उपसंरपंचपदी जालिंदर कदम यांची निवड निवडणूक

निर्णय अधिकारी जयराम ठुबे आणि सुर्यभान सौदागर यांनी केले. यावेळी सदस्य रुपाली कदम, किरण कदम, प्रशांत

कदम, कविता वाघमारे आदी उपस्थित होते.


संरपंच मंगल कदम म्हणाले की, आपले गाव शिखरावर

नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जालिंदर कदम यांच्यापाठीमागे आपण सर्वांनी उभे राहून गावच्या

विकासाला चालना देऊ. विकासात लोकमताचा विचार केला जाईल. गेल्या १५ वर्षात विकास कामामुळे आपल्या

गावाला राष्टरीयस्तरीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. त्यामुळे

आपल्या गावाचा नावलौकिक वाढला आहे. असेच काम आपण पुढील काळात करू असे ते म्हणाले.


यावेळी ग्रामस्थ पाडुरंग कदम, इद्रभान कदम, भागवत कदम, चंद्रभान कदम, श्रीधर कदम, जबाहरी कदम,

जयराम कदम, फकीर शेख धोडींभाऊ कदम, विश्वनाथ कदम, रोहिदास वाघमारे, विष्णू वाघमारे, देविदास कदम,

बाळासाहेब कदम, शिवाजी कदम, भाऊसाहेब कदम आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post