वाढीव वीज बिला विरोधात नगरमध्ये भाजप आक्रमक पावर हाउस ला ठोकले टाळे

 वाढीव वीज बिला विरोधात  नगरमध्ये भाजप आक्रमक पावर हाउस ला ठोकले टाळे
*महावितरणला भाजपचा शॉक*
*मध्य मंडल भाजपच्या वतीने तेली खुंट पावर हाऊसला टाळे ठोक आंदोलन*
महाराष्ट्र राज्यभरात महावितरण वीज कंपनीने राज्यातील 75 लाख ग्राहकांना आपल्या घरातील लाईट चे कनेक्शन तोडण्याची नोटीस दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे चार कोटी जनता अंधारात ढकली जाणार आहे. या घटनेचा निषेध म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकाच वेळेस आंदोलन करीत असल्याची माहिती मध्य मंडल नगर शहर अध्यक्ष अजय चितळे यांनी दिली. मध्य मंडल भाजपाच्यावतीने महावितरणच्या तेलीखुंट येथील कार्यालयाला टाळे ठोकून जोरदार आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झालेला होता, याचा फायदा घेऊन महावितरण वीज कंपनीने नागरिकांना अंदाजे बिल टाकून त्याचे वाटप केले. सदरचे बिल 3 ते 4 महिन्या चे एकत्रित असल्यामुळे त्याचा आपोआपच बोजा नागरिकांवर आला. लॉक डाऊन च्या काळात अनेक नागरिकांचे हातचे काम गेले अनेक नागरिक बेरोजगार झाले. त्यातच महावितरण वीज कंपनीचा हा दंडेलशाही चा कार्यक्रम चालू असल्याची भावना यावेळी श्री चितळे यांनी व्यक्त केली. नगर शहरांमधील ज्या नागरिकांना वीज कनेक्शन तोडण्याबाबत ची नोटीस आलेली असेल त्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सदरचे बिल चुकीचे आहे की बरोबर आहे, हे महावितरण कार्यालयात जाऊन तपासून घ्यावे. त्यासाठी महावितरण वीज कंपनीने स्वतंत्र कक्ष सुरू करावा, जर नागरिकांकडे एकरकमी पैसे भरण्यासाठी नसेल तर महावितरण वीज कंपनीने त्यांना यासाठी बिलाची रक्कम पाहून आठ ते दहा हप्ते पाडून द्यावेत अशी मागणीही यावेळी अजय चितळे यांनी केली.
यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे व नरेंद्र कुलकर्णी यांनी शासनाच्या भोंगळ कारभारावर तीव्र शब्दात टीका केली. आंदोलनावेळी अजय ढोणे, अभिजीत ढोणे, अभिजीत चिप्पा, राहुल कवडे, अतुल दातरंगे, सचिन वाघ, अजय राऊत, अमित पाथरकर, रोहीत मुळे, आशिष आनेचा, सचिन कुलकर्णी, रोशन गांधी, प्रशांत चितळे, संतोष लोंढे, अमित किर्तने, डॉ. दर्शन करमाळकर, भूषण अंभोरे, महेश हेडा, गोपाल वर्मा, आदेश गायकवाड आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post