अडीच लाखांची लाच...मनपाचा बडा अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात

 अडीच लाखांची लाच...मनपाचा बडा अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यातनगर : नगर महापालिकेचा एक बडा अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकला आहे. बुधवारी नाशिक एसीबीने केलेल्या कारवाईत आरोग्य अधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नरसिंह सार्वेत्तमराव पैठणकर याला अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलं. सावेडीतील कचरा डेपो येथील कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. अहमदनगर महापालिकेचा मृत जनावरांच्या दाहिनीचा प्रकल्प आहे. तक्रारदार ठेकेदाराने हे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी पैठणकर याने पाच लाख रुपये मागितले होते. हे बिल मंजूर करण्यासाठी काही प्रशासकीय पातळीवर त्रुटींचा अडथळा होता, तो दूर करण्यासाठी पैठणकर याने हे पैसे मागितले होते. त्यातील अडीच लाख रुपये स्वीकारताना पैठणकर याला नाशिकच्या पथकाने ताब्यात घेतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post