नगर तालुक्यातील ७१ क्रशरचालकांना १६५ कोटींच्या वसुलीसाठी नोटीसा

 महसुलचा झटका : प्रथमच वीजबिलांवर रॉयल्टीची आकारणी :  खडी क्रशर चालकांचा बेमुदत बंद सुरू

नगर तालुक्यातील ७१ क्रशरचालकांना १६५ कोटींच्या वसुलीसाठी नोटीसा 




नगर तालुका महसुल प्रशासनाने तालुक्यातील क्रशर चालकांना चांगलाच झटका दिला असुन प्रथमच वीजबिलांवर रॉयल्टीची आकारणी सुरू केली आहे . यामुळे तालुक्यातील ७१ क्रशरचालकांना १६५ कोटी रूपयांच्या वसुलीसाठी नोटीसा आल्या आहेत . या नोटीसांमुळे क्रशर चालक संतप्त झाले असुन त्यांनी क्रशर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे .


नगर तालुक्यात ७१ खडी क्रशर चालक असुन त्यांची संघटना आहे . तालुक्यातील कापुरवाडी, पोखर्डी , खंडाळा , चास,घोसपुरी , सारोळा कासार , निबोंडी , देहेरे , मांडवा , राळेगण म्हसोबा , आगडगाव, वारूळवाडी आदि गावात खडी क्रशर आहेत . आता पर्यत या सर्वांना ठरावीक महसुल ठरवुन दिला जायचा त्याप्रमाने हा महसुल क्रशरचालक शासन दरबारी भरत . मात्र यावेळी प्रथमच महसुल प्रशासनाने तालुक्यातील ७१ क्रशर चालकांना लाईटबीलांवर आधारीत रॉयल्टी ( स्वामित्व धन ) ची आकारणी साठी नोटीसा पाठवल्या आहेत . प्रत्येक चालकाला प्रत्येकी ४ ते ५ कोटीच्या वसुलीसाठी नोटीस आल्याने क्रशर चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत .७१ चालकांना मिळुन १६५ कोटी रूपयांच्या वसुलीसाठी नोटीसा पाठवण्यात आल्याने क्रशर चालकात खळबळ उडाली आहे .

याबाबत क्रशरचालकांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगीतले की , महसुल प्रशासनाने प्रथमच वीजबिलावर रॉयल्टीची आकारणी सुरू केली . मात्र हे फक्त नगर तालुक्यातच सुरू केले आहे .क्रशरसाठी वीजचे युनीट वापराचे नियम विचारात न घेता नोटीसा पाठवल्या आहेत . याबाबत महसुल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच अतिरीक्त जिल्हाधिकारी पी एम सोरमारे यांना निवेदन दिले असुन जोपर्यत आमच्या वरील नोटीसा मागे घेतल्या जात नाहीत तोपर्यत आम्ही क्रशर सुरू करणार नाही असे क्रशर चालकांनी स्पष्ट केले आहे . यामुळे तालुक्यातील सर्व क्रशर पाच दिवसांपासुन बंद करण्यात आले आहेत . यावेळी क्रशरचालक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक भगत , उपाध्यक्ष संपत लोटके , सचिव प्रभाकर घोडके , प्रविण कार्ले, सुरेश वारूळे , सुभाष आढाव , महादेव भगत , विशाल उजागरे , मिनिनाथ दुसुंगे , अजय कराळे आदी उपस्थीत होते .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post