प्रस्थापितांकडून माझं राजकारण संपवण्याचा डाव मतदार आभार सभेत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले बरसले

 नगर तालुक्‍यातील जिल्हा बॅंकेतील मतदारांचे आभार माजी मंत्री कर्डिले यांनी मानले

प्रस्तापितांनी मला राजकारणातून संपवण्याचा केला होता डाव - माजी मंत्री शिवाजीराव कर्डिलेनगर - जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाजप पक्षाच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन पक्षाच्या

वतीने निवडणूकीची जबाबदारी माजी मंत्री राधाकृष्ण विखे व माझ्यावर दिली होती त्यानंतर मी माजी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन बँक बिनविरोधचा प्रस्ताव ठेवला ही बँक

जुने जानते जेष्ठ नेत्यानी उभी केली याठिकाणी पक्षीय राजकारण नको अशी भुमिका माडल्यानंतर त्यांनीसुद्धा पाठिंबा दिल्यानंतर खासदार सुजय विखे, माजी मंत्री

राधाकृष्ण विखे यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर महसुल मंत्री बाळासाहेब यांच्याशी संपर्क केला आणि निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर दोन्ही बाजूनी

बिनविरोध निवडणूकीसांठी तयार झाले त्यानंतर सर्व साखर कारखानदार व प्रास्तापिक पुढाऱ्यांनी आपआपल्या जागा बिनविरोध करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली

आणि बिनविरोध करून घेतल्या पण माजी जागा बिनविरोध होऊ नये यासाठी काही पुढाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून ही निवडणूक लादली. निवडणूक लादली याच्याशी

माझी तक्रार नाही लोकशाही पद्धतीने निवडणूकीला सामोरे गेले आणि मोठ्या मतधिक्याने जिल्हा बँकेचा संचालक होणार असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

यांनी केले.

जिल्हा सहकारी बँकेच्या मतदानाच्या दिवशी मतदारांचे आभार मानित असताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदचे सदस्य

माधवराव लामखडे, पै. संभाजी लोढे, विष्णू खादवे, सुरेश शिदे, बलभिम शेळके, दत्तापाटील शेळके, विलास शिदें, अक्षय कर्डिले, सभापती अभिलाश घिगे, उपसभापती

संतोष म्हस्के, मनोज कोकाटे, वंसत सोनवणे, रेवण चोभे, अशोक झरेकर, नारायण आव्हाड, शिवाजी कार्ले, बन्सी कराळे, संजय ढोणे, अमोल गाडे, मनेष साठे, दिलीप

भालसिंग, दत्ता तापकिरे आदीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, नगर तालुका सोसायटी संघातून उमेदवारी करीत असतांना माझ्या विरोधात यांना उमेदवार मिळत नव्हता माजी

खासदार दादापाटील शेळके यांचे चिंरजीव रावसाहेब पाटील शेळके यांना उमेदवारीसाठी आग्रह करत होते. परंतु त्यांनी त्यांना नकार देऊन सांगितले की, शिवाजीराव

कर्डिले हे शेतकऱ्यांचे प्रश्न बँकेत माडतात तसेच माझे वडिल त्यांच्या विरोधात असतांनाही माझ्या वडिलांचे नाव नगर तालुका बाजार समितीला देण्याचे काम केले. उमेदवार

मिळत नसतांना क वर्गातील उमेदवाराला उभे राहता येत नव्हते तरी सहकार मंत्र्याकडून दबाव आणूण हा उमेदवार उभा केला. माझ्याकडे कुठलेही पद नसतांना व

सरकारचा दबाव असतांनाही तालुक्याची जनता माझ्यापाठीमागे उभी राहिल्यामुळे माझा विजय होणार आहे. जिल्हा बँकेची ओळख ही कारखानदारांपुरती मर्यादीत होती.

परंतु गेल्या पंधरा वर्षात शेतकऱ्यांच्या दारापर्यंत घेऊन गेलो व शेतकऱ्यांना केंद्र व राज्यांच्या योजना समजावून मिळून देण्याच काम केले. पुर्वी जिल्हा बँकेचा वार्षिक

होणाऱ्या नफाचे वाटप कारखानदार वाटून घ्यायचे परंतु ते काम मी बंद केले. आता शेतकऱ्यांपर्यंतही नफ्याचे वाटप होऊ लागले. करोनाच्या संकटाच्या काळामध्ये केंद्र व

राज्यसरकारने मदतीचा हात दिला जिल्हाबॅकेनेही शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी मी जिरायत भागातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जवाटप केले. नगर

तालुक्‍यातील शेतकऱ्यांना सुमारे दिडशे कोटीचे वाटप केल्यामुळे कारखानदार व प्रस्तापित नाराज झाले व ते जागे होऊन कर्डिले हे संचालक पदावर दिसता कामा नये

यासाठी त्यांनी माझ्या विरोधात काम करण्यास सुरूवात केली. जिल्हा बँकेत मी त्यांना अडसर ठरतो म्हणून मला संपवण्याचा डाव गेली पंचवीस वर्षापासून करतात मागील

आमदारकीच्या निवडणूकीमध्ये माझी हलगंर्जीपणा व दुर्लेक्षामुळे माझा पराभव झाला. राजकारणात मला संघर्षाशिवाय कुठहीली गोष्ट मिळाली नाही माझ्याकडे आता

आमदारकी नाही साखर कारखाना नाही कॉलेज नाही तरीही जनता माझ्यापाठीमागे आहे. तरी जिल्हाबँकेच्या माध्यमातून जिरायत भागाची शेतकऱ्यांची उतराई करणार.

जिरायत भागाला जर बँकेतून कर्ज दिल्यानंतर लबाड व चोर ठरवत असतील तर यापुढे कारखानदारांना कर्ज देतांनाही विरोध केला जाईल. कारखानदारांना दोन दोन, तीन

तीन कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले जाते मग शेतकऱ्यांना १०0 कोटी रूपये दिले तर काय बिघडले? शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य जनतेसाठी या कारखानदारांच्या

विरोधात संघर्ष करणार. शेतकऱ्यांना कर्ज देण्यास विरोध केल्यास कारखान्यांना कर्ज देण्यास विरोध राहिल जिल्हा बॅकेही ही आता केंद्रसरकारच्या नाबार्ड अंतर्गत काम

करत आहे. रिजर्व बँकेच्या नेमात बसत नसतांनाही कारखानदारांना कर्ज वाटप केले जाते. यापुढील काळात सर्व निवडणूका जनतेच्या पाठबळावर ताकदीनिशी लढवणार आहे. जिल्हा परिषद व


बाजार समितीच्या निवडणूकांमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीप्रमाणे यश मिळवणार आहे. असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाबासाहेब खर्से यांनी केले व आभार प्रदर्शन सुरेश शिंदे यांनी मानले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post