वर्गणी द्या, नाही तर तुम्ही देशद्रोही आहात.वर्गणीच्या नावाखाली भाजपाचे पुढारी खंडणी गोळा करतात-आ.लहू कानडे

  वर्गणी द्या, नाही तर तुम्ही देशद्रोही आहात.वर्गणीच्या नावाखाली भाजपाचे  पुढारी खंडणी गोळा करतात-आमदार लहू कानडेराजेंद्र उंडे  प्रतिनिधी

वर्गणी द्या, नाही तर तुम्ही देशद्रोही आहात.वर्गणीच्या नावाखाली भाजपाचे काही पुढारी खंडणी गोळा करत आहे. काँग्रेसमध्ये त्यांना मानसन्मान होता, त्यांनी सत्तेत  भरपेट खावून भरधाव धावणाऱ्या भगव्या अश्वाला पाहुन तेही पळाले पण त्यांना भगव्या वातावरणात किती मानसन्मान मिळतो हे आज दिसत आहे.माजी मंञी रधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता टिका केली.सर्वसामान्यांनी दिलेली वर्गणी सन्मानाने घेतली पाहिजे.परंतू दिलेली वर्गणी ऐवजी आम्ही सांगतो तेवढीच वर्गणी दिली पाहिजे असे सांगितले जाते.याचा अर्थ वर्गणी ऐवजी खंडणीच गोळा केली जात आहे.असे आमदार लहू कानडे यांनी सांगितले.

           महसुलमंञी ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कृष्णा मुसमाडे हे होते.  त्यावेळी आ.कानडे बोलत होते. यावेळी भाजपाचे काही पुढारी वर्गणी गोळा करण्या ऐवजी खंडणी गोळा करीत आहे. जर कोणी वर्गणी दिली नाही तर तुम्ही देशद्रोही आहात. रामराम करण्याऐवजी  जयश्रीराम म्हणा असे सांगितले जाते.भावनात्मक लाटा तयार करुन सत्ता काबीज करण्याचा यांचा डाव आता जनतेच्या लक्षात आला आहे.
              यावेळी नाशिक पदविधर मतदारसंघाचे आमदार डाँ.सुधीर तांबे, ज्ञानदेव वाफारे,  काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष  बाळासाहेब चव्हाण ,श्रीरामपूर नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे,सचिन गुजर,गणपतराव सांगळे,अंकुश कानडे,राजेंद्र बोरुडे,कुमार भिंगारदे,जयेश माळी,गिताराम बर्डे, आदींनी भाजपावर सडकुन टिका केली.कार्यक्रमाचे प्रास्तविक  बाळासाहेब खांदे यांनी केले.
        यावेळी ज्ञानेश्वर मुरकुटे,अशोक खुरुद, अमृत धुमाळ,सुखदेव मुसमाडे,उत्तमराव कडू, कुणाल पाटील, भाऊराव कांगुणे, संजय पोटे,माजी नगराध्यक्ष इंदुमती खांदे, भाग्यश्री कदम आदी व्यसपीठावर उपस्थित होते.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post