'या' न्यायाने राज्यात ४ उपमुख्यमंत्री हवेत: राज्यमंत्री बच्चू कडू

 'या' न्यायाने राज्यात ४ उपमुख्यमंत्री हवेत: राज्यमंत्री बच्चू कडूवर्धा : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्ष कोण होणार यावर चर्चा सुरु असतानाच आता उपमुख्यमंत्रीपदारूनही दावे होवू लागले आहेत. त्यावर आता चार उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री अस करावं, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. वर्ध्याच्या स्थानिक विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते.


उपमुख्यमंत्रीपद अपक्षाला पण दिल पाहिजे. सगळे पाठिंबा देणारे पक्ष जर उपमुख्यमंत्री पद मागत असतील तर अपक्षाला का देऊ नये, असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. सोबतच अपक्षाला उपमुख्यमंत्री पद देत एक मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री करावं आणि एक वाढवत चार उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री अस पाच होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री कडू यांनी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post