जिओ फोन खरेदीवर 2 वर्षापर्यंत अनलिमिटेड कॉलिंग फ्री

 जिओ फोन खरेदीवर 2 वर्षापर्यंत अनलिमिटेड कॉलिंग फ्री रिलायन्स जिओने आपल्या जिओफोन युजर्ससाठी नवी ऑफर आणली आहे. नवा जिओ फोन 2021 अशी ही ऑफर आहे. यामध्ये केवळ 1999 रुपयात जिओ फोन खरेदीवर 2 वर्षापर्यंत अनलिमिटेड कॉलिंग फ्री असेल. इतकंच नाही तर महिन्याला 2 GB डेटाही मिळेल 

या ऑफर देशभरात 1 मार्चपासून लागू होणार आहे.  याशिवाय दुसरी एक ऑफर आहे. या ऑफरनुसार 1499 रुपयात जिओफोनसह 1 वर्षांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 2 GB डेटा मिळेल. या ऑफरसह कंपनीने सध्याच्या ग्राहकांचीही काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार 750 रुपयांच्या हप्त्यासह एका वर्षापर्यंत रिचार्जपासून मुक्ती मिळेल. शिवाय त्यांना अमर्यादित कॉलिंग आणि महिन्याला 2GB डेटा मिळेल.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post