जिल्हा बँकेवर "यांची'' झाली बिनविरोध निवड, वाचा सविस्तर


जिल्हा बँकेवर गडाख, कोल्हे, नागवडे, जगताप बिनविरोधनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी राजकीय बैठकांत मोठ्या घडामोडी झाल्यात. यातून बरेच मंथन होवून काही जागा बिनविरोध झाल्या आहेत. यात मंत्री शंकरराव गडाख यांचाही समावेश आहे. महिला राखीव गटातून अनुराधा नागवडे या बिनविरोध झाल्या आहेत.  

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री,मा.नामदार शंकरराव पाटील गडाख साहेब यांची अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेवासा सोसायटी मतदारसंघातुन संचालक पदी बिनविरोध निवड. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे बिनविरोध. बँकेच्या विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून वैभव पांडुरंग पाचपुते व प्रवीण कुरुमकर यांनी माघार घेतल्याने माजी आमदार राहुल जगताप बिनविरोध संचालक झाले आहेत.अखेरच्या दिवशी माजी आमदार वैभव पिचड यांनी आपला अनुसूचित जाती व बिगर शेती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. 


सेवा सोसायटी मतदार संघ

अकोले - सिताराम गायकर

जामखेड - अमोल राळेभात

कोपरगाव-  विवेक कोल्हे

नेवासा - मंत्री शंकरराव गडाख

पाथर्डी- आमदार मोनिकाताई राजळे

राहाता - अण्णासाहेब म्हस्के

राहुरी - अरुण तनपुरे

संगमनेर - माधवराव कानवडे

शेवगाव - चंद्रशेखर घुले

श्रीगोंदा - राहुल जगताप

श्रीरामपुर - भानुदास मुरकुटे


अनुसुचीत जाती मतदार संघ

अमीत भांगरे


इतर मागासवर्ग

करण जयंत ससाणे


विमुक्त जाती भटक्या जमातीमधे

गणपतराव सांगळे


शेती पुरक प्रक्रीया

आमदार अशुतोष काळे


महीला प्रतिनीधी मतदार संघ

अनुराधा नागवडे

आशा तापकीर


हे १७ बिनविरोध

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post