एकनाथ खडसेंचे मिशन सुरु, 31 आजी माजी नगरसेवकांना बांधले घड्याळ

 एकनाथ खडसेंचे मिशन सुरु, 31 आजी माजी नगरसेवकांना बांधले घड्याळजळगाव: भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपला जेरीस आणण्याचे काम सुरु केले आहे. भाजपमधील खडसे समर्थक नेते आणि कार्यकर्ते आता राष्ट्रवादीची वाट धरू लागले आहेत. जळगावमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला गळती लागली आहे. भुसावळमधील तब्बल 31 आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. यामध्ये 18 विद्यमान आणि 13 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. या नगरसेवकांच्या कुटुंबीयांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post