महाराष्ट्रात कोरोनाची नवी लाट आल्याची भीती, देशातील सर्वाधिक रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात कोरोनाची नवी लाट आल्याची भीती मुंबई - गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा कहर अनुभवल्यानंतर गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटत आली आहे. मात्र आता मुंबईसह महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येक वेगाने घट झाल्यानंतर काल ४२ दिवसांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात देशातील कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या ३३६५ रुग्णांची नोंद झाली. तर केरळमध्ये २८८४ रुग्ण सापडले. ३० नोव्हेंबरनंतर प्रथमच महाराष्ट्रात एवढे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाची नवी लाट आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post