हरेगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा, 69,240 रुपयांच्या मुद्देमालासह 3 आरोपी ताब्यात
दि. 22 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत हरेगाव ते उंदिरगाव जाणारे रोडवर एका टपरी चे आडोशाला काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहेत अशी माहिती मिळाल्याने त्यांनी पोलिस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता आरोपी सचिन लक्ष्मण गायकवाड (वय 39 रा. उंदीर गाव तालुका श्रीरामपूर) , दीपक मेघन भोसले (वय 45 रा.डी. क्वार्टर ता श्रीरामपूर), मयूर सर्जेराव पगारे (वय 24 रा उंदीर गाव तालुका श्रीरामपूर) यांचेसह 69,240 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.अन्य चार आरोपी फरार असून सर्व आरोपी विरुध्द श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे,Dy.s.p संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल भोईटे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मेढे, नितीन चव्हाण, सुनील शिंदे आदींनी केली.
Post a Comment