लग्नसराईच्या तोंडावर सोन्याचे दर 2 हजारांनी घसरले

लग्नसराईच्या तोंडावर सोन्याचे दर 2 हजारांनी घसरले नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात आयात शुल्क कपातीची घोषणा केल्यानतंर आता  गेल्या चार दिवसांत सोन्याचा दर २ हजार रुपयांनी घसरल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे चांदीचा दरही कमी झाल्याची माहिती आहे. 

आताच्या घडीला मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ४७ हजार ५४९ रुपये आहे. त्याआधी सोने २०० रुपयांनी वधारून ४८ हजार ०४९ रुपयांपर्यंत गेले होते. चांदीचा भावातही घसरण झाली असून, एका किलो चांदीचा भाव ६८ हजार ३५६ रुपये झाला आहे. 

दिल्लीमध्ये सोन्या-चांदीचा भाव 

– 22 कॅरेट सोन्याचा भाव – 46890 रुपये

– 24 कॅरेट सोन्याचा भाव – 51150 रुपये

– चांदीचा दर – 68500 रुपये

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post