'या' अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रूग्णांवर मोफत उपचारांची सोय

 रोटरी इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट 3132 मार्फत डॉ.गरूड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रूग्णांवर मोफत उपचारांची सोयअहमदनगर : शहरातील नगर-मनमाड रोडवरील डॉ.गरुड कॅन्सर हॉस्पिटल 35 वर्षांपासून कॅन्सरग्रस्तांवर यशस्वी उपचार करीत आहे. येथील अत्याधुनिक उपचार सेवांचा लाभ जास्तीत जास्त गरजू रूग्णांपर्यंत पोहचविण्यासाठी रोटरी इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट 3132ने हॉस्पिटलशी सामंजस्य करार केला आहे. याअंतर्गत रोटरीच्या 11 जिल्ह्यामधील क्लबच्या मार्फत रूग्णांना कॅन्सरवरील मोफत उपचारांसाठी डॉ.गरूड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येणार आहे. रोटरीचे प्रांतपाल हरिष मोटवानी, फर्स्ट लेडी रेणु मोटवानी यांनी नुकतीच डॉ.गरूड कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी सदर निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हरिष मोटवानी व रेणु मोटवानी यांचे डॉ.प्रकाश गरूड व डॉ.सौ.पद्मजा गरूड यांनी स्वागत करून त्यांचा सन्मान केला.
रोटरी इंटरनॅशनल क्लब तसेच रोटरियन्सने शिफारस केलेल्या रूग्णांवर याठिकाणी कॅन्सरवर मोफत उपचार केले जाणार आहेत. याशिवाय कॅन्सर तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे. डॉ.प्रकाश गरुड हे नामांकित कॅन्सर सर्जन असून मुंबईतील टाटा कॅन्सर हास्पिटलचाही त्यांना अनुभव आहे. त्यांनी 30 हजारांहून अधिक कॅन्सर रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना नवीन जीवन प्रदान केले आहे. गरुड हॉस्पिटल ऍण्ड अहमदनगर कॅन्सर सेंटर येथे सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया, कॅन्सर केमोथेरपी, रेडियोथेरपी, मॅमोग्राफी, बे्रस्ट कॅन्सर (स्तनाचा कॅन्सर) शस्त्रक्रिया, बे्रस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी, हेड ऍण्ड नेक कॅन्सर, जबड्याचे, घशाचे, जिभेचे, स्वरयंत्राचे, ब्रेन, थायरॉईड कॅन्सरवर शस्त्रक्रिया व उपचार केले जातात. याशिवाय गर्भपिशवी, अंडाशयाचे कॅन्सर, किडनी, मूत्राशयाचे, योनीमार्गाचे, शिष्नाचे, अंडाशयाचे कॅन्सर, जठर, लिव्हर, आतड्याचे, गुदव्दाराचे, स्वादूपिंडाचे, पित्ताशयाचे कॅन्सर, अन्ननलिकेचे, फुफ्फुसाचे कॅन्सर, हाडांचे कॅन्सर, त्वचेचे कॅन्सर इत्यादी प्रकारच्या कॅन्सरवर शस्त्रक्रिया व उपचार उपलब्ध आहेत. गरुड हॉस्पिटलमध्ये कॅन्सर डिटेक्शन व्हॅन सुविधा 24 तास उपलब्ध आहे. अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, वातानुकुलीत व अद्ययावत सेवा सुविधांनी सुसज्ज सर्जिकल आय.सी.यु.याठिकाणी आहे. हॉस्पिटलमध्ये एकाच छताखाली कॅन्सर शस्त्रक्रिया, केमोथेरपी व लाईट उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. गरुड हॉस्पिटलमध्ये नुकतेच आंतरराष्ट्रीय अमेरिकन तंत्रज्ञानाचे रेडिओथेरपी मशिन सेवा उपलब्ध झाली आहे. गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथील प्रशिक्षित व अनुभवी डॉक्टरांची टिम कार्यरत आहे.  केंद्र शासनाची प्रधानमंत्री जीवन आरोग्य विमाय योजनेंर्तत कॅन्सरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत रेडिओथेरपी लाईटसह कॅन्सर शस्त्रक्रिया, केमोथेरपी हे सर्व उपचार मोफत केले जातात. या सोयी सुविधांचा लाभ जास्तीत जास्त कॅन्सर रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन कॅन्सर सर्जन डॉ.प्रकाश गरुड व डॉ.सौ.पद्मजा गरुड यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post