ज्ञानेश्वर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी आ.नरेंद्र घुले तर व्हा.चेअरमनपदी पांडुरंग अभंग

ज्ञानेश्वर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी आ.नरेंद्र घुले तर व्हा.चेअरमनपदी पांडुरंग अभंग अहमदनगर- लोकनेते मारूतरावजी घुले पाटील, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना चेअरमन पदी माजी आमदार डॉ. नरेंद्रजी मारूतरावजी घुले पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर व्हाईस चेअरमन पदी पांडुरंग गमाजी अभंग यांचीही फेरनिवड करण्यात आली आहे.

शेवगाव नेवासा या दोन तालुक्यात कार्यक्षेत्र असलेला ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची खरी कामधेनू असुन आजपर्यंत स्वर्गीय मारूतरावजी घुले पाटील यांच्या नंतर माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी कारखाना वाढवण्यावर भर दिला. जास्तीत जास्त गाळप करून ऊस उत्पादक शेतकरी यांना न्याय दिला आणि आज माननीय माजी आमदार डॉ नरेंद्र घुले पाटील यांच्या रूपाने एक विश्वासू व कार्यक्षमता असलेले नेतृत्व कारखान्यास मिळाले असल्याने सभासद शेतकरी, कामगार यांच्या मधुन अभिनंदन केले जाते आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post