सासर्‍याचा नीचपणा, सुनेवरच केला अत्याचार....गुन्हा दाखल होताच झाला फरार

सासर्‍याचा नीचपणा, सुनेवरच केला अत्याचार....गुन्हा दाखल होताच झाला फरारनगर : सासऱ्याने आपल्या सुनेवर वारंवार अत्याचार करून सासरा - सुनेच्या नात्याला काळीमा फसल्याचा धक्कादायक प्रकार कोपरगाव तालुक्यातील एका गावात घडला.  याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून सासऱ्यासह पतीच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.२६ ) गुन्हा दाखल करण्यात आला. यातील महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सासरा फरार आहे.

२१ वर्षीय महिलेचे कोपरगाव तालुक्यातील एका गावातील तरुणाशी मे २०१८ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर तीन महिने सासू, सासरे व सासू हे सुनेशी चांगले वागत होते. मात्र, काही दिवसांनी सासऱ्याची वाईट नजर पडली. त्यानंतर सून अंघोळ करताना डोकावणे, चहा दिल्यानंतर तिचा हात पकडणे अशा गोष्टी सासरा करू लागला. ऑगस्ट २०१८ मध्ये एके दिवशी दुपारी १ वाजेच्या सुमारास सून घरात एकटीच असल्याचे पाहून सासऱ्याने तिच्यावर बळजबरी करून अत्याचार केला. कुणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या आईला मारून टाकीन, अशी धमकी दिली. सुनेने त्याच रात्री आपल्या पतीला व सासूला घडलेला प्रकार सांगितला. मात्र त्या दोघांनीही सुनेचे काहीच ऐकले नाही. त्यानंतर सासऱ्याने त्याच महिन्यात पुन्हा सून घरात एकटी असताना तिच्यावर दोनदा अत्याचार केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post