सुनेवर बलात्कार,सासरा अटकेत सुनेवर बलात्कार,सासरा अटकेत

श्रीगोंदा (प्रमोद आहेर) - श्रीगोंदा तालुक्यातील माठ येथे नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली असुन, सासऱ्याने सुनेवर बळजबरी करत तिच्यावर अतिप्रसंग केला.याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात सासू सासऱ्यासह नंदावा विरोधात काल दि.१८फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.असुन या प्रकरणातील मुख्य आरोपी सासऱ्याला बेलवंडी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.      
  याबाबत सविस्तर वृत्त असे कि, श्रीगोंदा तालुक्यातील माठ येथील रहिवासी असलेली पीडित महिला आपल्या कुटुंबासह राहत होती.दि.१० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजणेच्या सुमारास पीडित महिला घरात एकटी असताना आरोपी असलेला तिचा सासरा ती एकटी असल्याचा फायदा घेत तिच्या सोबत लगट करू लागला. पिडीतीने प्रतिकार केला असता त्याने तु ओरडू नकोस तुझा आवाज  ऐकून कोणीही मदतीसाठी येणार नाही.असे म्हणून दमदाटी करत  मला खाली पाडून बळजबरीने बलात्कार केला.व घडलेला प्रसंग कोणाला काही सांगू नको कोणाला काही सांगितल्यास तुला व तुझ्या आई वडिलांना जीवे ठार मारीन असे सांगून निघुन गेला.झालेल्या प्रकाराने घाबरून पीडित महिलेने याबाबत कोणासही काही सांगितले नाही.
मात्र घडलेल्या प्रकाराने मानसिक धक्का बसल्याने पिडीत महिलेने दि.१६ फेब्रुवारी रोजी घडलेला प्रकार तिने तिचा नवरा, सासु,आणि नंदावा यांना सांगितले असता त्यांनी झालेला प्रकार कोणाला सांगु नको, आमची बदनामी व इज्जत घालवू नको तुला त्रास होईल अशा प्रकारे झालेला प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला.सदर पीडित महिलेने बेलवंडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन सासू सासरा आणि नंदावा असे तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. बेलवंडी स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी तात्काळ  यातील मुख्य सासरा आरोपी याला मध्यरात्रीच  अटक केले. तर दोन आरोपी फरार झाले असुन ,याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोऱ्हाडे, पो.हे.कॉ.रावसाहेब शिंदे करीत आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post