'मला तू फार आवडतेस’ असे म्हणून सासऱ्याने केला सुनेवर अत्याचार

'मला तू फार आवडतेस’ असे म्हणून सासऱ्याने केला सुनेवर अत्याचार नगर : सासऱ्याने २७ वर्षीय सुनेवर  अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पती व सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. अत्याचाराची घटना २६ डिसेंबर २०२० आणि शनिवारी (दि.६) अशी दोनदा संगमनेर तालुक्यातील राजापुरात घडली.

याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे. अत्याचाराबाबत पतीकडे तक्रार केल्यानंतर ‘तुला माझे वडील म्हणतील तसे ऐकावेच लागेल’ असे पती म्हणाला. खोलीत एकटी असताना सासरा खोलीत आला. ‘मला तू फार आवडतेस’ असे म्हणून तोंड दाबून अत्याचार केला. याबाबत कुणाला काही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. सासऱ्याने दोनदा केलेल्या अत्याचाराबाबत पतीला सांगितले. ‘ तुला माझे वडील म्हणतील तसे ऐकावेच लागेल’ असे पतीने सांगितले. तुमच्या विरोधात तक्रार देणार आहे, असे म्हटल्यानंतर पोटावर काठीने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले अधिक तपास करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post