जन्मदाताच ठरला वैरी, स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून

 


जन्मदाताच ठरला वैरी, स्वत:च्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खूनराहुरी : ज्याने जन्म दिला तोच बाप वैरी बनल्याने एका अल्पवयीन मुलीला जीव गमवावा लागला आहे. राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात ही घटना घडली असून पोलिसांनी नराधम पित्याविरुध्द गुन्हा दाखल करून अटक केली आहे. राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक गणेश किसन शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या नराधम पित्याविरोधात खून, अनैसर्गिक अत्याचार, पोस्को या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर ऊसतोडणी करणारे कुटुंब ब्रह्मणी परिसरातील शेतात झोपडीत राहते.  12 फेब्रुवारी रोजी रात्री आरोपीने मुलीला गावात घेऊन जातो असे त्याच्या पत्नीस सांगितले. मुलीस तो बाहेर घेऊन गेल्यानंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास तिच्यावर अत्याचार करून तिला राहत्या झोपडीपासून जवळच असणाऱ्‌या ओढ्यालगतच्या विहिरीत फेकून दिले. त्यानंतर अपराधाचा पुरावा नाहीसा करण्याकरिता मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने झोपेत असताना पळवून नेले अशी खोटी फिर्याद पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, 15 फेब्रुवारी रोजी पोलीस शोध घेत असताना सदर मुलीचा विहिरीत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सदर मुलीचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. सदर मुलीवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे अहवालातून समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करीत त्याला ताब्यात घेतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post