नेवाशातील ऊस जाळण्याच्या घटनेवरुन फडणवीस यांची मंत्री गडाखांवर जोरदार टिका

 शिवसेनेचे मंत्री शेतकर्‍यांचा गळा घोटतायत...हिच का शिवसेनेची शिवशाही?

नेवाशातील ऊस जाळण्याच्या घटनेवरुन फडणवीस यांची मंत्री गडाखांवर जोरदार टिकामुंबई : नेवासा तालुक्यात एका उस उत्पादक शेतकर्‍याने कारखान्याकडून उस तोड होत नसल्याने उभा उस पेटवून दिल्याची घटना घडली आहे. मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखालील मुळा सहकारी साखर कारखान्यावर आरोप करीत शेतकर्‍याने हे कृत्य केले. या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून भाजपने मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह शिवसेनेला लक्ष्य केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया देत शिवसेनेचे मंत्री शेतकर्‍यांचा गळा घोटत असल्याची टिका केली आहे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत असलेली शिवशाही, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी व्टिटमध्ये म्हटले आहे की, दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणार्‍या शिवसेनेचे मंत्री शेतकर्‍यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण. शेतमाल खरेदी करताना सुद्धा राजकीय मापदंड लावणार्‍या पक्षांना खरे तर लाज वाटली पाहिजे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही? आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकर्‍यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकर्‍यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून पुढचे कर्ज नाही. म्हणजे शेतकर्‍यांनी जगायचेच नाही. मुळा साखर कारखान्याच्या माध्यमातून हा प्रताप चालविलाय, नेवाशात शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी. मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांनी तत्काळ हस्तक्षेप करीत या शेतकर्‌यांना न्याय मिळवून द्यावा, ही माझी माफक अपेक्षा आहे. किमान अन्नदात्याला तरी पक्षीय चष्म्यातून बघू नका !


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post