भूखंड घोटाळ्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी?
पुणे : माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव आलेल्या भूखंड घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. फडणवीसांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदार अंजली दमानिया यांनी वकील ऍड. असीम सरोदे यांच्यामार्फत न्यायालयात केली आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बैठकीतील सगळे पुरावे- मिनिट्स ऑफ मीटिंग रद्द करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, असा आरोप अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यामुळे एसीबीने भूखंड घोटाळ्यात कोणाची चौकशी करणं आवश्यक आहे, याची यादीच सरोदेंनी न्यायालयात दिली.
Post a Comment