माजी खासदारालाही ऑनलाईन फसवणुकीचा फटका

 

माजी खासदारालाही ऑनलाईन फसवणुकीचा फटकापरभणी :  ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. सिम कार्ड, एटीम कार्ड ब्लॉक झाले आहे, केवायसी करायचे आहे, आदी सांगून फोन वरूनच असंख्य नागरिकांना फसवले जात आहे. यात भर पडली आहे परभणीचे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांची. तुकाराम रेंगे यांना मोबाईल सिम कार्ड ब्लॉक झाले आहे ते नियमित करण्यासाठी अॅप डाउनलोड करायला लावून 49 हजार रुपयांना गंडवल्याचे समोर आले. तुकाराम रेंगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमांविरोधात शहरातील ननल पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post