माजी आमदार दौलतराव पवार यांचे निधन

माजी आमदार दौलतराव पवार यांचे निधन श्रीरामपूर - विचार जागर मंचचे अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. दौलतराव मल्हारी पवार (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते. पुणे येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. दरम्यान, पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्यांना श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

त्यांची प्रकृती खालावल्याने साखर कामगार रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होत . तिथं आज (दि. १०) दुपारी एक वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माजी आमदार दौलतराव पवार यांच्या पश्चात पत्नी सुभद्रा, चार मुले सुधाकर, अ‍ॅड. भागवत, वैज्ञानिक डॉ. शरद व अनिल यांच्यासह सूना, नातवंडे असा परिवार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post