इंग्लंडचा टीम इंडियावर 227 धावांनी विजय

इंग्लंडचा टीम इंडियावर 227 धावांनी विजय

 


पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा 227 धावांनी पराभव झाला आहे, चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या डावात टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांची आवश्यकता होती. मात्र भारतीय संघ 192 धावांवपर्यंत मजल मारु शकला.


चेन्नई कसोटीत लाजिरवाना पराभव पत्करावा लागला आहे. भारताने पहिला कसोटी सामना 227 धावांनी गमावला. 420 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 192 धावांवर बाद झाला. कर्णधार कोहलीने भारताकडून सर्वाधिक 72 धावा केल्या. शुभमन गिल 50 धावा केल्या. इंग्लंडकडून जॅक लीचने 4, जेम्स अँडरसनने 3, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि डॉम बाईसने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post