भटक्या कुत्र्यांनी जमिन उकरली आणि आढळला मुंडके नसलेला मृतदेह


भटक्या कुत्र्यांनी जमिन उकरली आणि आढळला मुंडके नसलेला मृतदेहनगर : : तालुक्‍यातील टाकळी कडेवळीत येथील माळरानावर सोमवारी  काही कुत्र्यांमुळे धक्कादायक घटना समोर आली आहे.  शीर नसलेला पुरुषाचा मृतदेह कुत्र्यांनी उकरून काढला. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली. स्थानिक रहिवाशांनी शोध घेतला असता, मृतदेह आढळून आला.  मृतदेहाचे शीर गायब असून, खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जमिनीत मृतदेह पुरला असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. 

 तहसीलदार प्रदीपकुमार पवार, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, डॉ. संघर्षशील राजुळे घटनास्थळी दाखल झाले. पुरलेला मृतदेह बाहेर काढला. मात्र, त्याचे शीर घटनास्थळी आढळले नाही. मृतदेहाच्या अंगावर निळा शर्ट व राखाडी पॅन्ट आहे. मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मृतदेहाच्या उत्तरिय तपासणीनंतर वस्तूस्थिती समोर येणार आहे. अपर पोलिस अधीक्षक सौरव अग्रवाल, उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देत पोलिसांना सूचना केल्या. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post