महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकल्यांमुळं भाजप 'या' आमदारासह 25 जणांवर गुन्हा

महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकल्यांमुळं भाजप  'या' आमदारासह 25 जणांवर गुन्हा

 नाशिक : वाढीव वीज बिलाविरोधात भाजपनं काल राज्यभरात आंदोलन केलं. अनेक शहरात महावितरणच्या कार्यालयाला भाजप नेत्यांनी टाळं ठोकलं. नाशिकमध्येही भाजप आमदार देवयानी फरांदे आणि शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलं होतं. त्या प्रकरणी नाशिक पोलिसांनी आमदार देवयानी फरांदे यांच्यासह  जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नाशिकमध्ये भाजपचं आंदोलन सुरु असताना पोलिस कर्मचारी आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये झटापट झाली होती. त्याचाच ठपका ठेवत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात आमदार देवयानी फरांदे आणि शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनीच फिर्यादी होत सरकारवाडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post