पेट्रोल, डिझेल दरवाढ....पहले इस्तेमाल करे...फिर ‘विश्वासघात’ करे...

 पेट्रोल डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने विश्वासघात आंदोलन
प्रतिनिधी : पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आज युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे पाटील यांच्या सूचनेवरून जिल्हा युवक काँग्रेस, शहर युवक काँग्रेस आणि नगर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने झोपडी कॅन्टीन येथील दीपक पेट्रोल पंपावर विश्वासघात आंदोलन करण्यात आले. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले,महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आ.डॉ.सुधीर तांबे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हा युवक अध्यक्ष स्मितलभैया वाबळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या आंदोलनात शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मयूर पाटोळे नगर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट युवा नेते अंकुश शेळके, विशाल कळमकर, राजू बोरुडे, सुजित जगताप, विशाल घोलप आदी युवक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. देशातील युवक आणि महिलांच्या भावना नागरिकांच्या गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या संदर्भातील भावना अत्यंत तीव्र आहेत. मोदी सरकारने पेहेले इस्तेमाल करो, फिर विश्वासघात करो अशा पद्धतीने देशातील जनतेची घोर फसवणूक केली आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post