मुख्यमंत्र्यांची झोपमोड झाल्याने अधिकारी निलंबित

 मुख्यमंत्र्यांची झोपमोड झाल्याने अधिकारी निलंबितभोपाळ : मुख्यमंत्र्यांची झोपमोड केल्याने  एका ज्युनियर इंजीनिअरला  थेट घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या दौऱ्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी ज्युनियर इंजीनिअरला निलंबित केलं आहे. या निलंबनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा निकृष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. आपला दौरा आटोपून मुख्यमंत्री जेव्हा शासकीय विश्रामगृहावर रात्री झोपायला पोहोचले, तेव्हा काही मिनिटातच डासांनी कहर केला. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना डासांच्या चाव्यामुळे उठून बसावे लागले. या विश्रामगहात मच्छरदाणीची ही सोय नव्हती.

राजकीय पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना रात्री मुक्काम करता यावा यासाठी विश्रामगृहाची सोय असते, यावर शासनाचा मोठा खर्च होतो, तरी देखील तेथे गैरसोय होत असल्याचं समोर आलं. रात्री अडीच वाजता मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. यानंतर या रुममध्ये औषधाची फवारणी करण्यात आल्यानंतर त्यांना कुठेतरी झोप लागली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post